बारामती : बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना नागरिकांना भेटण्यासाठी एका कागदावर भेटीचे कारण द्यावे लागते.तर नगरसेवक नागरिक थांबले असले तरी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश करतात.नगरसेवकांना परवानगीची गरज नाही का? मुख्याधिकारी यांचेकडून असे वेगवेगळे नियम केले जात आहेत.
नगरसेवक आणि आधिकारी दोघे सुध्धा विसरून जातात की जनतेचे आपण सेवक आहोत.मुख्याधिकारी यांना विसर पडला आहे की नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे.तरी मुख्याधिकारी राजकीय लोकांच्या दबावाखाली का काम करीत आहेत.तरी सामान्य माणसाला सुधा राजकीय पदाधिकारी सारखी वागणूक मिळाली पाहिजे.जर नगरपरिषद कर्मचारी यांनी वेळेत कामे केली तर नागरिकांना वरिष्ठ आधिकारी यांचेकडे जावे लागणार नाही.
नगर पालिकेत आल्यानंतर मुख्याधिकारी यांचा दौरा कधी आहे? तसेच कार्यालयात किती वाजता उपस्थित असणार आहेत याबाबत माहिती दिली जात नाही. नागरिक तक्रार घेऊन मुख्याधिकारी यांचेकडे आले असता नगरसेवक थेट कार्यालयात येतात. बारामतीत लोकसेवक राजकीय पुढारी यांचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.






