बारामती : अनेक वर्ष जनता दरबार जनतेसाठी घेतला जातो.याठिकाणी अधिकारी,कर्मचारी नेत्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात.आता तर दोन जनता दरबार म्हणजे नागरिकांच्या अडचणी सुटतील अशी परिस्थिती दिसत आहे.
एवढ्या वर्ष आमदार,खासदार एकाच पक्षाचे असताना देखील आजसुध्दा नागरिकांना रांगेत उभे राहून आपले प्रश्न जनता दरबारात मांडावे लागतात.
निवडणुकीवेळी जसे नागरिकांचे घरापर्यंत प्रचार करण्यासाठी नेते आणि नेत्यांचे कार्यकर्ते लोकांपर्यंत जाऊन प्रचार करत असतात.त्यावेळी लोकांनी प्रश्न जाब विचारला पाहिजे की आमच्या अडचणी नेत्या पर्यंत पोचवून न्याय मिळवून देण्यासाठी हेच कार्यकर्ते कधी दिसणार नाहीत. कार्यकर्ते आता नेत्याला दाखवतात की मी किती जोरात प्रचार करीत आहे.कधीच लोकांचे काम न करणारे प्रचार करीत असतील तर याच कार्यकर्त्यांमुळे लोकांचे मत परिवर्तन होत आहे.लोकांची कामे न करणाऱ्या व्यक्ती वर जनता विश्वास ठेवणार का?कधी इतर वेळेस न दिसणारे कार्यकर्ते पदाधिकारी आता दिसू लागले आहेत.
नेता किंवा त्याचा कार्यकर्ता फक्त निवडणुकीपुरता जनतेच्या दारात येत असेल तर नक्कीच त्याला जनता जाब विचारणार अशी परिस्थिती आहे. ज्यांच्या हाती सत्ता त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्याची का गरज का पडते? अद्याप पर्यंत या दरबारांमध्ये किती लोकांना न्याय मिळाला हे कधी जाहीर झाले नाही. नागरिकांनी देखील पुढे येऊन कधी याबद्दल मत व्यक्त केलेले दिसले नाही. ज्या लोकांनी जनता दरबार मध्ये काही कामानिमित्त अर्ज दिले त्याची नोंद आणि केलेली कामे जाहीर करावीत आणि ज्या लोकांच्या अडचणी जनता दरबार मध्ये येऊन देखील सुटल्या नाहीत त्या सुद्धा जनतेसमोर मांडणार का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
-
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आज बारामतीत सभा.. -
टपरीवर विकला जातोय गुटखा कधी होणार अवैध्य व्यवसायातून बारामतीची सुटका




