बारामती : बारामती येथील अमोल खरात माजी बारामती तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या वाढदिवसानिमित्त चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होम बारामती येथे मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने घेण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन बारामती शहर अध्यक्ष निखीलभाई खरात यांनी केले होते .
सदर कार्यक्रमाचे ठिकाणी बोलताना अमोल खरात यांनी सांगितले की वाढदिवस साजरा करताना इतर खर्च टाळून सर्वांनी समाज उपयोगी कार्यक्रम घेतले पाहिजेत.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,संपर्क प्रमुख शुभम गायकवाड,जिल्हाध्यक्ष अस्लम वस्ताद शेख,बारामती शहर अध्यक्ष निखिलभाई खरात,बारामती शहर संघटक समीर खान, पत्रकार स्वप्नील कांबळे,संतोष सवाणे ,सामाजिक कार्यकर्ते विनोद सवाणे,संतोष जगताप,सुरज आल्हाट,अमित वाघमारे उपस्थित होते.
-
ऑनलाईन मोबाईल चक्री ॲप चालविणाऱ्या शाहरुख सारख्या चालकांची संख्या मोठी? युवा वर्गाने अशा ॲपचा वापर करू नये. -
“सोशल मिडियावर आक्षेपार्ह दृश्ये/पोस्ट/फोटो/व्हिडिओ/रिल्स तसेच अफवा न पसरविण्याबाबत पोलिसांचे आवाहन”




