मोरगाव : मोरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री जोमात चालू आहे.चौकी समोरील दुकान, पान टपरी मध्ये गुटखा विकला जात आहे.गुटखा या टपरी, दुकाना पर्यंत पुरवठा करणारे कोण? गुटख्याच्या अवैध वाहतुकीची माहिती पोलीस प्रशासनाला मिळत नाही का? गुटखा विक्री करणारे पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? लवकरच इतर अवैध्य व्यवसाय ठिकाण सहित महाराष्ट्राचे नेतृत्व माध्यमातून प्रसिद्ध केले जाणार आहेत.
युवकांमध्ये मोबाईल वर चक्री ,मटका ,खेळण्याचे प्रमाण वाढले आहे.
सूपा पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा एक व्यक्ती युवकांना मोबाईल वरती ऑनलाईन चक्री ॲप देत आहे त्याचा रिचार्ज करण्याचे काम स्वतः ती व्यक्ती करते.आणि ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारतो.अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
या मोबाईलवर उपलब्ध चक्री गेम मुळे युवक जास्त प्रमाणावर ही गेम खेळत आहेत.याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.तात्काळ कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे






