वृक्षारोपण करत लग्नाचा पंधरावा वाढदिवस साजराः गोलांडे दाम्पत्याचा उपक्रम


सोमेश्वरनगर – सध्या तरूणाईमध्ये लग्नाचा किंवा स्वतः च्या वाढदिवसची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्टी करणे धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव काही तरूण वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक
उपक्रम राबवत असतात. असा एक उपक्रम सोमेश्वर-करंजे (ता बारामती)येथील लग्नाचा पंधरावा वाढदिवस नुकताच राबवला आहे. विनोद गोलांडे व पत्नी मेघा या दाम्पत्याचा १५ वा लग्नाचा वाढदिवसा निमित्त सोमेश्वर-करंजे येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.दरवर्षी गोलांडे दांपत्य हे वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा करत आल्याने त्यांचे सोमेश्वरनगर परिसरात कौतुक होत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page