बारामती : बारामती इंदापूर रोड पिंपळी येथे रस्त्याच्या कडेला पान टपरीतून अवैध दारू विक्री सुरू असल्याची बातमी देऊनही कारवाई होत नाही.रस्त्याच्या कडेला खुलेआम अवैध दारू विक्री करणाऱ्या कडे पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क का दुर्लक्ष करीत आहे? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
बारामती शहरात अनेक ठिकाणी छोट्या पान टपरी,किराणा मालाचे दुकानामध्ये गुटखा विक्री चालू आहे.गुटखा दुकानात पान टपरीत मिळत असल्यामुळे युवकांमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण वाढले आहे.या दुकान ,टपरी पर्यंत गुटखा कोण पोहोचवतो? या गुटख्याच्या अवैध वाहतुकीची माहिती पोलीस प्रशासनाला मिळत नाही का? गुटखा विकणारे, गुटख्याची अवैध वाहतूक करणारे, पुरवठा करणाऱ्यां वरती कारवाई करण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.
बारामती परिसरात मटका मोठ्या प्रमाणावर चालू आहे.याबाबत कोणत्या ठिकाणी मटका चालू आहे याची बातमी मध्ये माहिती देऊन ही कारवाई होत नाही.त्याचे नेमके कारण काय?
कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय बारामतीत आहे.त्यांना उपमुख्यमंत्री यांनी जाहीर सभांमध्ये देखील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश/सूचना दिले होते.या सूचनांचे पालन उपविभागीय पोलीस अधिकारी करीत नाहीत का? तरी देखील अवैध व्यवसाय सुरू कसे आहेत?याबाबत नागरीकांमध्ये चर्चा आहे.
पत्रकार बातमी देतात त्यांच्या विरुद्ध खोट्या कारवाई केल्या जातात.त्यामुळे पत्रकार सत्य मांडताना पत्रकारांना विचार करावा लागत आहे. पत्रकार आपले काम व्यवस्थित करू शकत नाही. ही खरी परिस्थिती बारामती मधील आहे.
बारामती शहरातील अवैध व्यवसायावर कधी कारवाई होणार?पोलीस प्रशासनाला या अवैध व्यवसायाची माहिती मिळत नाही का? पत्रकार किंवा सामान्य नागरिकांनी माहिती दिली तर सदर व्यवसायांवर एकदा कारवाई होते.थोड्या दिवसानंतर परत व्यवसाय सुरू होतो.पुन्हा अवैध व्यवसाय सुरू होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय करणार का?






