फलटण : भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके यांना निवेदन देण्यात आले. फलटण शहरात किंवा गावाच्या आसपास चायनीज मांजाची विक्री खूप प्रमाणात चालू आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.या मांजामुळे अनेक अपघात झाले आहेत. यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन देताना भारतीय युवा पॅंथर संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विराज भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मंगल ताई जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण काकडे,फलटण तालुका अध्यक्ष मंगेश भाऊ इंगळे,फलटण तालुका उपाध्यक्ष आदेश कांबळे संपर्कप्रमुख संदीप पेटकर, फलटण महिला शहराध्यक्ष पूजा जगताप,फलटण शहर महिला उपाध्यक्ष पूजा काकडे ,शहर संघटक महिला सीमा कुंभार, फलटण शहर उपाध्यक्ष जीतोबा अहिवळे, झिरपवाडी शाखा उपाध्यक्ष विकास रिटे शाखा अध्यक्ष सोनू इंगळे सदस्य भरत जाधव सदस्य आशिष काकडे यांच्या उपस्थितीत होते.





