माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकाचे हरविलेले १ लाख २५ हजाराचे एकुण १० मोबाईल परत


माळेगाव : पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकाचे हरविलेल्या मौल्यवान किमती वस्तु / मालमत्ता सदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारीचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणेसंदर्भात मा. श्री. अंकित गोयल सो.. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण याचे सुचना व मार्गदर्शनाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मधील नवनिर्मित माळेगाव ठाणे हददीतुन नागरीकाचे गहाळ / हरविलेले मोबाईल बाबत माळेगाव पोलीस स्टेशन प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने हरविलेल्या मोबाईल शोध घेणेकरीता श्री किरण अवचर, पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांचेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन त्यातुन प्राप्त माहीतीचे तांत्रिक विश्लेषण करुन 1) प्रशात नानासो तावरे रा सांगवी ता. बारामती जि. पुणे 2) सोमनाथ तुकाराम सावत रा.मेडद ता. बारामती जि. पुणे 3) मनिष कुमार मग्गल रा विदया प्रतिष्ठाण परीसर, बारामती जि.पुणे 4) नितीन विठठ्ल गायकवाड रा. वरकुटे बु ता.इंदापुर जि.पुणे 5) अमोल बाळु मदने रा. गिरवी ता. फलटण जि.सातारा 6) शारदा रामकृष्ण वाकुडे रा. कवठेकरवस्ती माळेगाव नगरपंचायत ता. बारामती जि.पुणे 7) स्नेहल हनुमत जाधव रा.सांगवी ता.बारामती जि.पुणे 8) दादासाहेब खोमणे रा. जळगाव सुपे ता. बारामती जि.पुणे 9) प्रकाश मुरलीधर यादव रा. सायबाचीवाडी ता. बारामती जि. पुणे 10 ) जनार्धन ज्ञानदेव राऊत रा खटकेवस्ती गोखळी ता. फलटण जि. सातारा असे अ.क्र. 1 ते 10 यांचे एकुण 1,25,000 /- रु. ( अक्षरी एक लाख 25 हजार रु. जु.वा. कि.अ.) चे एकूण 10 मोबाईल हॅन्डसेट हे कर्नाटक तसेच महाराष्ट्र राज्य मधील विविध ठिकाणांहून शोध घेवून ते माळेगाव पोलीस स्टेशन येथे प्राप्त करुन घेण्यात आलेले आहेत.

सदरचे मोबाईल हे दिनांक 06/07/2023 रोजी सायं. 07.00 वा. चे सुमारास बारामती पोलीस व नगरपरिषद बारामती यांचे वतीने नागरीकासाठी मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालय, बारामती या ठिकाणी आयोजित करणेत आलेल्या परिसंवाद बैठक दरम्यान मा. श्री. आनंद भोईटे सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. श्री. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग याचे हस्ते वरील मुळ मालकाना परत दिलेले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अंकित गोयल सो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. आनंद भोईटे सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, श्री प्रविण खानापुरे, सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, श्री. किरण अवचर, पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यानी केलेली आहे. तसेच • याकामी पोलीस नाईक श्री. महेश कोळी सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी सहकार्य केलेले असुन नागरीकाचे किंमती हरविलेले मोबाईल हे माळेगाव पोलीस स्टेशन कडुन शोध घेतलेमुळे पुन्हा ताब्यात मिळालेने मोबाईल मालक व सदर कार्यक्रमास उपस्थित नागरीकांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

माळेगाव पोलीस स्टेशन कडुन माहे मे 2023 मध्ये 79,000/- किमतीच्या एकुण 07 मोबाईल सह एकुण दोन लाख 4 हजार रुपये किमतीचे 17 मोबाईल नागरीकांचे हरविलेले मोबाईल शोधुन परत देणेत यश आलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page