वार्जे कर्वेनगर येथील आरोग्य विभागाला शिवसेना पदाधिकारी यांनी दिले निवेदन


प्रतिनिधी: गणेश थोरात

कीटकनाशक औषध फवारणी करण्याची मागणी

पुणे : दिनांक ६ जुलै रोजी आरोग्य विभाग, वार्जे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदन दिले. कर्वेनगर प्रभागातील वेगवेगळ्या भागात पावसामुळे जे पाणी साठते त्यामुळे डास, मच्छर होवून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. म्हणून गल्ली , वस्ती, सोसायटी अशा ठिकाणी औषध फवारणी, कीटकनाशक पावडर टाकण्यात यावी. यासंदर्भात निवेदन आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी कारकुड यांना देण्यात आले. तसेच डॉ.तरडे आरोग्य विभाग प्रमुख ह्यांच्या बरोबर फोन वर बोलून समस्या सांगण्यात आल्या. त्यांनी आम्ही ताबडतोब यावरती कारवाई करू असे आश्वासन दिले.


यावेळी उपशहर प्रमुख सचिन मामा थोरात हयांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा शिंदे, उपशहर प्रमुख महिला आघाडी, विभाग प्रमुख मयूर पानसरे व सुप्रिया पाटेकर, प्रभाग प्रमुख वर्षा शिंदे, शिवसैनिक आकाश शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page