बारामती नगर परिषदेची अनधिकृत होर्डिंगवर कारवाई


बारामती : बारामती शहरातील काही ठिकाणी नगर परिषद हद्दीत विना परवानगी होर्डिंग लावण्यात आले होते. आज सदर होर्डिंग वरती बारामती नगर परिषदेने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने कारवाई केली.
यावेळी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे,अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनिल धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व बारामती नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोरगाव रोडवरील एकुण ९ होर्डिग्ज दोन क्रेन गॅस कटर व इतर साहित्याच्या मदतीने होर्डिंग काढण्यात आले.होर्डिंग काढण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराला १५ दिवसापुर्वी नोटीस बजावण्यात आली होती. तथापि संबंधित ठेकेदारांनी नोटीसीला केराची टोपली दाखवली होती त्यामुळे आजपासून होर्डिंग्ज काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती नगर परिषदेकडून मिळाली. पहिल्या टप्प्यात जे होर्डिंग धोकादायक आहेत. ते होर्डिंग प्रथम काढण्यात येणार आहे नंतर सरसकट सर्व होर्डिंग्ज काढण्याची मोहिमेमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे याबाबत विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी देखील नगर परिषद प्रशासनाला होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते.
बारामती नगर परिषद हद्दीत विनापरवानी होर्डिंग्ज लावणाऱ्यांवरती अशाच प्रकारची कारवाई केली जाईल.बारामती नगर परिषदेची रीतसर परवानगी घेतल्यानंतर होर्डिंग लावण्यात यावेत असे मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page