बारामती : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त दि.5/5/2023 रोजी संजय वाघमारे (बारामती तालुका अध्यक्ष RPI आठवले)यांच्या पुढाकारातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, कसबा बारामती याठिकाणी भव्य असा खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या भीम अनुयायांनी खीर प्राशनाचा आस्वाद घेतला .
यावेळी मा. रत्नप्रभा ( ताई) साबळे- पुणे जिल्हा महिला अध्यक्षा, मा. शशिकलाताई वाघमारे -पुणे शहर महिला अध्यक्षा, मा. सुनीलजी शिंदे- सचिव प.महाराष्ट्र, मा. रविंद्र (पप्पू) सोनवणे युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, मा.मयूर मोरे – युवक अध्यक्ष बारामती शहर, मा.सीमाताई घोरपडे आदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे बारामती शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मान्यवर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारामती शहर सोशल मीडिया उपाध्यक्षांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांची निवड




