महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कबड्डी  क्रीडा स्पर्धेचे समारोप सोहळा संपन्न


पुरूष गटातील मुंबई शहर  तर महिला गटातील पुणे जिल्हा संघ विजयी

बारामती दि. ८ : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानात आयोजित या कार्यक्रमाला तहसीलदार विजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, स्पर्धा संयोजक सचीन भोसले, राष्ट्रीय खेळाडू अर्जुन अवार्ड विजेता शांताराम जाधव, आंतरराष्ट्रीय मैदानी खेळाडू भाग्यश्री बिल्ले, राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब आव्हाड, पंचप्रमुख दत्ता झिंजुर्डे, तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, महेश चावले आदी उपस्थित होते.


६ जानेवारी पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुष वरिष्ठ गटात अहमदनगर जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, धुळे, नाशिक, ठाणे, अमरावती व वाशिम जिल्हा तर महिला वरिष्ठ गटात पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, कोल्हापूर, रायगड, नागपूर व अमरावती जिल्हा हे संघ सहभागी झाले होते.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत चुरसीचे सामने खेळले गेले. आज झालेल्या अंतिम सामन्यात पुरूष गटात मुंबई शहर संघ विजेता तर उपविजेता मुंबई उपनगर तर महिला गटातील पुणे जिल्हा विजेता तर उपविजेता मुंबई शहर राहिले. पुरूष गटात नाशिक तृतीय स्थानी वाशिम ४ थ्या स्थानी तर महिला गटात मुंबई उपनगर तृतीय स्थानावर तर कोल्हापूर ४थ्या स्थानी राहिले.
यावेळी प्रांताधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षक, पंच, शाळेतील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page