बारामती प्रतिनिधी:- शेतकऱ्यांचे मागील सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी निवेदनाद्वारे बहुजन समाज पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी खचाखच भरले होते त्यामुळे शेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी मोटारी चालू करण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता.

एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतामधील हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.आणि अशातच शासनाकडून थकीत वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे तगदा लावलेला आहे.तरी मागील सहा महिन्यांचे शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे अन्यथा आगामी काळात मोठे जनआंदोलन उभारू असा इशाराही देण्यात आला.
यावेळी बहुजन समाज पार्टी चे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती चव्हाण, तसेच इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष सवाने, हर्षद मोरे, संदीप सवाने, रोहित सवाने ,तसेच आदेश सोनवणे, नाना लोंढे उपस्थित होते.






