बारामती : सर्व पथविक्रेत्यांना कळविणेत येते की, केंद्र शासन पुरस्कृत प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यास शासन निर्णय क्रं. पीएमस्वनिधी – 2020/ प्र. क्र. 77/ नवि-20, दि. 17 जून 2020 अन्वये सुचित केलेले आहे. तरी बारामती शहरामधील विक्री/व्यवसाय करणा-या फेरीवाले/ पथविक्रेते / लघु व्यावसायिक यांनी लाभ घ्यावा.
लाभाचा तपशिलः-
1.नागरी पथविक्रेते यांना रक्कम रूपये 10,000/- 20,000/- व 50,000/- पर्यंतचे बँकेमार्फत विनातारण खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
2.सदर कर्जावर आर. बी. आय. च्या प्रचलित दराप्रमाणे व्याज दर लागू राहिल.तसेच त्याचे दरमहा हप्त्याने परतफेड केल्यास 7 % वरील व्याज अनुदानाचा लाभ दिला जाईल.
3.नियमित डिजिटल व्यवहार केल्यास कॅश – बॅक साठी पात्र .
पात्र लाभार्थीः-
1.बारामती नगरपरिषदेने केलेल्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात आढळलेले परंतू त्यांना विक्री प्रमाणपत्र/ ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते.
2.बारामती शहरामध्ये विक्री / व्यवसाय करणारे पथविक्रेते
आवश्यक कागदपत्रेः-
1.आधारकार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
2.मतदान ओळखपत्र
3.रेशनकार्ड
4.बँक पासबुक झेरॉक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
1.पोर्टल ( http://pmsvanidhi.mohua.gov.in)
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. अली मुल्ला ( 8888849083 ) पहिला मजला, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष .दीअंयो-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY – NULM ) महिला व बालकल्याण विभाग ,बारामती नगरपरिषद, बारामती.
*विशेष मोहीम अंतर्गत बारामती नप मध्ये सर्व ऑनलाईन प्रक्रिया करून दिली जात आहे फक्त कागदपत्रे घेऊन यावीत*
अशी माहिती बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.






