बारामती : भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्याला आई किंवा वडील नाहीत आणि गरीब आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असते परंतु शालेय साहित्य नसते. म्हणून संघटनेच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे संघटनेच्या माध्यमातून एक छोटीशी मदत करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणारी अडचण दूर करण्याचा प्रयत्न संघटना करीत आहे.
आज दिनांक१६/०५/२०२२रोजी पणदरे येथील दोन विध्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले.या अगोदर पणदरे जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये विध्यार्थ्यांना शालेय साहित्य किट दिले होते.

त्यानंतर शालेय साहित्याची आवश्यकता असल्याचे भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या बारामती महिला तालुकाध्यक्ष प्रियंका सोनवणे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले .

सदरचा एक हात मदतीचा उपक्रम भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव आहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित आहे.
पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करणार आहोत.अशी माहिती भारतीय युवा पॅंथर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड यांनी दिली






