बारामती : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे बारामती शहर पोलिसातर्फे सायबर क्राईम अवेअरनेस, पोलिसांची ओळख, वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, या संकल्पनेतून दोन दिवसात विविध कार्यक्रम राबवण्यात आले होते
आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी लोकांमध्ये आरोग्याविषयी स्वतः प्रति जागृती निर्माण व्हावी म्हणून नागरी वस्ती मधून दहा किलोमीटर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला बारामती सत्र न्यायालयाचे प्रमुख सत्र न्यायाधीश श्रीमती जे पी दरेकर मॅडम प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए जे गिऱ्ह. व अतकिरे साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सव्वा सहा वाजता सुरुवात केली. यावेळी बारामती उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे माननीय विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य श्री अजित दादा पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील व बारामतीतील मान्यवर उपस्थित होते. सदरची मॅरेथॉन भिगवन रोड, जैन मंदिर ,माळावरची देवी, प्रशासकीय भवन कसबा देशमुख चौक गांधी चौक, सिनेमा रोड यावरून परत तीन हत्ती चौकामध्ये समाप्त करण्यात आली. पाच वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या तरुणांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. महिलांनी या स्पर्धेमध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उभयतांनी यामध्ये सहकुटुंब सहभाग नोंदवला .सर्व सहभागी मान्यवरांना प्रमाणपत्र देण्यात आले. बारामती शहर पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेले अधिकारी कर्मचारी तसेच दंगल काबू पथक यातील कर्मचारी व विविध पोलीस अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. मी साध्या विषयातील पोलीस व पोलीस वर्दीतील माणूस या घोषवाक्य खाली तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर अनेकांनी सेल्फी काढल्या. बारामतीकरांसाठी स्वतःसाठी आरोग्य जपा हा मंत्र या मॅरेथॉन मधून सर्वांपर्यंत पोहोचला. बारामती शहरातील एनव्हायरमेंटल फोरम यांनी यामध्ये भाग घेतला. आज अनेक ठिकाणी सायकल रॅली व इतर ठिकाणी मॅरेथॉन ट्रेकिंग असताना सुद्धा अडीचशे लोकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला अनेक पत्रकार बंधू हे सुद्धा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले होते व त्यांनी पोलिसांना सहकार्य केले सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पोलीस अधीक्षक डॉ. अविनाश देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बंदोबस्त व कामाची व्यस्तता असताना सुद्धा थोड्या कालावधीत केले.
-
पूर्व निहित संगम फाउंडेशतर्फे मोफत तिरंगा ध्वज वाटप
-
स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण