बारामती : माझी वसुंधरा अभियान 2022 मध्ये नगरपालिका गटात बारामती शहरास तिसरा क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल बारामती नगर परिषदेकडून सर्व बारामती करांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व पर्यावरण बाबत बारामती शहरात होत असलेली कामे व त्यामुळे होत असलेला बदल व त्यासाठी शहरातील नागरिकांचा असणारा सहभाग यामुळेच हे शक्य झाले आहे.
अजित पवार उपमख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले यावेळी बारामती नगर परिषद मुख्याधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी आणखी बरेच गोष्टीवर काम करण्याबरोबर या अभियानात शंभर टक्के बारामती करांचा सहभागाशिवाय शक्य होऊ शकणार नाही.
आपली बारामती स्वच्छ सुंदर हरित बारामती करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.






