बारामती शहरात सर्रास विकला जातोय गुटखा विक्रेता आणि पुरवठा करणाऱ्यांवर कधी होणार कारवाई?


बारामती : बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे.जर महाराष्ट्र मध्ये गुटखा उत्पादन,विक्री,वाहतूक करण्यास बंदी असेल तर बारामतीमध्ये गुटखा मिळतो कसा? हा गुटखा कोणत्या मार्गाने बारामतीमध्ये येतो याबाबात अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती मिळत नाही का? बारामती शहरात किराणा दुकान,पान टपरीवर गुटखा विकत मिळतो.तर या टपरी आणि दुकानापर्यंत गुटखा कोण पोहोचवतो? बारामतीमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांना मधून होत आहे.
बारामती मधील पोलीसांना चांगला तपास आणि रिकव्हरी केल्याबद्दल मा.पोलीस अधीक्षक पुणे यांनी सन्मान केला आहे.मग पोलिसांना गुटखा अवैध रित्या वाहतूक करून बारामती शहरात येतो याबाबत माहिती नाही का?
गुटखा दुकानांमध्ये मिळत असल्याने युवा पिढीमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण वाढले आहे.युवा पिढीला व्यसनाधीन होऊ नये म्हणून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि गुटखा विक्री बंद करावी अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page