अनधिकृत भंगार दुकानांवर कधी होणार कारवाई?


बारामती : बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर भंगार खरेदी विक्रीची दुकाने आहेत.भंगार साठा करणेसाठी गोदाम/ गोडाऊन लोकवस्तीत बांधले आहेत.

दोन दिवसापूर्वी बारामती शहरातील मुल्ला वस्ती येथील भंगार साठ्याला आग लागली होती.ज्या ठिकाणी ही दुकाने आहेत त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक वस्ती आहे.लोक वस्तीत ही दुकाने कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. अनधिकृत भंगार दुकानावर कारवाई कधी होणार? बारामती नगर परिषद सदर दुकानांवर कारवाई का करीत नाही हा स्थानिक नागरिकांना प्रश्न पडला आहे.

या दुकानांवर बाहेर राज्यातील कामगार कामाला आहेत.दुकानालगत त्यांची राहण्याची व्यवस्था दुकानदाराने केली आहे.आग लागल्यामुळे जीवित हानी होऊ शकते.याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे.अग्निशमन विभागाचे परवाने भंगार दुकानदारांनी घेतले आहेत का? बारामती नगर परिषद मुख्याधिकारी सदर अनधिकृत दुकानांवर कधी कारवाई करणार? एखादी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page