
बारामती : गणपती मूर्ती विसर्जनासाठी बारामती नगर परिषदेने ठिकठिकाणी जलकुंभ तयार केले होते.त्याठिकाणी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र ( नानासाहेब ) सोनवणे हे दिनांक ०६/०९/२०२५ रोजी गणपती मूर्ती विसर्जन असल्याने कर्तव्यावर होते.यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना आपली नेमणुकीची जागा सोडून जेवायला जाणे शक्य नव्हते अशा वेळी प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांनी एकमेकांना सहकार्य करीत आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व कर्मचाऱ्यांनी भिगवण चौक येथे कामाचे ठिकाणी जेवण केले.कर्मचारी यांना श्री.सोनवणे यांचे सहकार्य असते असे कर्मचारी सांगतात.
शहरातील स्वच्छतेचा विषय असेल किंवा आरोग्य बाबत कोणतेही काम असले तरी सर्वसामान्य नागरिक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या कडून प्रथम नाव समोर येते आरोग्य निरीक्षक राजेंद्र (नाना) सोनवणे यांचे त्याचे कारण देखील तसेच आहे कोणत्याही भागातील स्वच्छतेची तक्रार असेल आणि नागरिकांनी राजेंद्र सोनवणे यांना कॉल केला तर नेहमी मदत करतात.संबंधित शहरातील एखादा भाग त्यांच्याकडे नसेल तरी देखील त्या विभागातील कर्मचारी यांना तात्काळ तक्रारी बद्दल माहिती देऊन नागरिकांचे काम मार्गी लावतात.
बारामती शहरात कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणची स्वच्छता काही वेळातच राजेंद्र सोनवणे करून घेतात.शहर स्वच्छ राहिले पाहिजे अशी त्यांची भूमिका असते आपले कर्तव्यप्रती त्यांची निष्ठा आहे.
बारामती नगरी स्वच्छ सुंदर ठेवण्यात या व्यक्तिचा मोठा वाटा आहे .पालिकेच्या कारभरावर बोट उचलणारे खुप आहेत.पण आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडणाऱ्या लोकांचे कौतुक करण हे पण एका बारामती च्या नागरिकांच कर्तव्य आहे .




