पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामतीच्या शरीरविकृतीशास्त्र विभागा अंतर्गत असलेले अद्यावत रक्तकेंद्र कार्यान्वित


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामतीच्या शरीरविकृतीशास्त्र विभागा अंतर्गत असलेले “अद्यावत रक्तकेंद्र ” दिनांक १९फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीचे अवचित्य साधुन रक्तसंकलन करण्यात आले.
या रक्त केंद्राचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा.डॉ.चंद्रकांत म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे, शरीरविकृतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व प्रा. डॉ.शारदा राणे, बारामती MIDC चे प्रादेशिक अधिकरी मा. हनुमंत पाटील ,मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे स्वीय सहायक मा. नितीन हाटे, मा. बाळराजे मुळीक, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे इतर अधिकारी व कर्मचारी व महाविद्यालयातील विदयार्थी उपस्थित होते.
सदरील रक्तकेंद्र हे अद्यावत असून यात रक्तासोबत रक्तातील HRBC, Plasma, RDP क्रायोप्रेसीपिटेट , Whole Blood हे घटक सुद्धा उपलब्ध होणार आहेत सोबतच हे रक्तकेंद्र 24×7 चालु राहणार आहे. रक्तकेंद्रासाठी लागणारे FDA चे लायसन्स रक्तकेंद्राला प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे अवचित्य साधुन दि. 19 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन सुद्धा रक्तकेंद्रात ठेवण्यात आले होते. यात महाविद्यालयातील डॉक्टर, विदयार्थी , नर्सेस, अधिकारी व कर्मचारी वर्गाने रक्तदान केले. यात 36 लोकांनी सहभाग नोंदवला. रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असुन बारामती शहर व आजुबाजुच्या परिसरातील लोकांनी उत्फुर्तपणे रक्दानात सहभागी व्हावे असे आव्हान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे व शरीरविकृतीशास्त्र शास्त्र विभाचे विभाग प्रमुख व प्रा.डॉ. शारदा राणे यांनी केले. सदरचे रक्तकेंद्र हे पूर्णपणे लवकरच कार्यान्वीत होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page