गीतांच्या माध्यमातून मतदान जनजागृती


बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याअंतर्गत पेन्सिल चौकात निवडणूक विषयक गीतांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, स्वीप समन्वयक सविता खारतोडे, गायन पथक आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. नावडकर यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व सांगून येत्या २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदान हक्क बजवावा, असे आवाहन केले.

यावेळी ‘आम्ही गड्या लोकशाही शिलेदार, मतदान नेहमीच करणार’…,’ग साजणी झाली सज्ञान, नाही अज्ञान, करण्या मतदान तू ग राणी’…,’जाऊ मताला मताला मताला जाऊ गं, चल जोडीने मतदान करू गं’…,’सुज्ञ नागरिक आपण गुणी कर्तव्याला जागु सर्वजणी’.. अशा गीताच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असून मतदान करण्याबाबत संदेश दिला. परिसरातील नागरिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानात सहभागी होण्याबाबत संकल्प यावेळी मतदारांनी केला.
0000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page