कोल्हापूर येथील ९ कुटुंबाचे पुनर्वसन केल्यामुळे बारामतीत ९० किलो पेढे वाटून आनंदोत्सव साजरा.


बारामती: कोल्हापूर जिल्ह्यात जातीय अत्याचारात उध्वस्त खून प्रकरणातील नऊ कुटूंबांना पेन्शन लागू करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेच्यावतीने गेली 4 वर्षे एन. डी. एम. जे चे राज्य महासचिव मा. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव मा. वैभवजी गिते यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाशी संघर्षमय लढा चालू होता. आज अखेर या वैभवजी गिते व ND.M.Jच्या सर्व युनिटच्या अभ्यासपूर्ण लढ्यसमोर प्रशासनाला झुकावे लागले व संबंधित कुटूंबाना प्रती महिना 5000 रुपये महागाई भत्या सह पेन्शन चालू करावी लागल्या मुळे 90 किलो पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

समाजकल्याण आयुक्त मा. विशाल लोंढे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.यापूर्वी सुद्धा सातारा जिल्ह्यातील 17 कुटुंबांना पेंशन चालू करून दिली आहे. यासाठी घरादाराची पर्वा न करता वैभव गिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ऐतिहासिक कार्य केले आहे. या लढ्याला मिळालेल्या यशाचा आनंद उत्सव आज बारामती शहरात विशेष सरकारी वकील ऍड. अमोल सोनवणे, अनिकेत मोहिते, मंगलदास निकाळजे, सुजय रणदिवे, भास्कर दामोदरे, सुमित साबळे, दत्ता कांबळे यांनी एकमेकांना पेढे भरऊन बारामती येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वैभवजी गिते
यांचा सन्मान करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page