ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या;भारत मुक्ती मोर्चाची मागणी


बारामती दि.१५: देशात सर्वत्रच ईव्हीएमला असणारा विरोध वाढत असून आपल्या देशातील सर्व निवडणुका ह्या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्या अशी मागणी भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे आणि तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लोंढे यांच्या नेतृत्वात तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देत करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष संतोष काकडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना तालुकाप्रमुख निखिल देवकाते यांनी उपस्थित राहत त्यांच्या या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला.

सध्या देशातील सर्वच विरोधी पक्ष,सर्वसामन्य मतदार यांच्या मनात ईव्हीएम विषयी शंका आहे.सर्वोच्च न्यायालयाने देखील दि.८ ऑक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या निकालात म्हंटले आहे कि ईव्हीएम वरती मुक्त,निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूका होऊ शकत नाही.तरी देखील निवडणूक आयोग कोणाच्या तरी दबावा खाली येऊन निवडणुका ईव्हीएमवरतीच घेण्याचा घाट घालत असून त्यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य मतदारांच्या मतदानाचा अधिकार धोक्यात आला आहे.देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी येणाऱ्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्या असं या निवेदनात म्हंटल आहे.

दरम्यान,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय शहराध्यक्ष मनोज केंगार,ॲड.संदीप मोरे,विशाल घोडके,संतोष यादव,वैभव लोंढे,सतीश रोडगे,वैभव सरोदे,नितीन चंदनशिवे,विनायक भोसले,सुरज लोंढे,सौरभ पोतदार व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page