ऑनलाईन मोबाईल चक्री ॲपची युवा मध्ये चर्चा


सुपे : ग्रामीण भागातील काही युवक ऑनलाईन मोबाईल चक्री ॲप चालवून मोठ्या प्रमाणावर पैश्याची उलाढाल करीत आहेत.या युवकांना बघून इतर युवक देखील असे व्यवसाय करू पाहत आहेत कारण कमी वेळात पैसे मिळत असल्याची चर्चा आहे.

चक्री ॲप चालवणारे अनेक शाहरुख आहेत. चालकांना चक्री मधून एकूण केलेल्या व्यवसायाच्या मोबदल्यात ५०% रक्कम मिळते.अशी चर्चा आहे. चालक मोबाईल फोन पे वरून पैसे घेऊन चक्री खेळण्यासाठी पॉइंट देतो.चक्री मध्ये जिकलेले पैसे फोन पे वरून पाठवतो.
असे ॲप चालविण्यासाठी शासनाची परवानगी घेतली आहे का? मिळालेले पैशाचा आयकर भरला जातो का? या चक्री ॲप मुळे पैसे हरल्यानंतर युवा वर्ग निराश होऊन व्यसनाधीन होऊ शकतो.
युवा हा कुटुंबातील महत्वाचा भाग आहे.त्यामुळे युवकांनी सुधा कमी वेळात पैसे मिळविण्याचा नाद सोडला पाहिजे.असे ॲप वरून पैसे मिळाले असते तर सर्वांनीच असे ॲप वर पैसे मिळविले असते.अशा फसव्या ॲप पासून दूर राहणे गरजेचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page