जनहित प्रतिष्ठान पुरस्कृत खेळिया The Playgroup ची शैक्षणिक सहल संपन्न …


बारामती : बुधवार दिनांक १० जानेवारी रोजी जनहित प्रतिष्ठान पुरस्कृत खेळिया The Playgroup ची शैक्षणिक सहल येथील “पुनावाला गार्डन’ येथे गेली होती. पुनावाला गार्डनमध्ये निसर्गरम्य अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेली, पक्षी आहेत.

तेथे गेल्यानंतर विदयार्थ्यांना झाडांची, वेलींची व पक्षांची नावे व माहिती तेथील बागकाम करणाऱ्यांनी छान सांगितली. तसेच मुलांनी घसरगुंडी, सिसॉ, झोके असे विविध खेळ खेळून तेथील निसर्गरम्य वातावरणात खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आले. अशा रितीने सहल आनंदीवातावरणात संपन्न झाली.


सदरच्या सहलीसाठी खेळिया The Playgroup च्या वर्गशिक्षिका सौ. स्वाती महामुनी, सेविका सौ. लक्ष्मी जौंजाळ व गाडीचालक श्री. दत्तुदादा कदाम यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page