सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहरच्या वतीने कलाकार कट्टा, डेक्कन पुणे येथे शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात भगतसिंग यांच्या जीवनातील प्रसंग, मनोगत, गीते तसेच कविता यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. भगतसिंग यांनी देशासाठी केलेले महान कार्य यातून दाखवण्याचा एक प्रयत्न होता. कार्यक्रम सुरू असताना आजूबाजूच्या लोकांनी देखील याठिकाणी मोठी गर्दी केली होती.
कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होता. या यशस्वी कार्यक्रमानंतर भविष्यात संघटन वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सम्यक अधिक जोरदार काम करेल असे रोहित भोसले यांच्याकडून सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक च्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. तीर्थली जंगम यांनी भगतसिंग यांच्यावरील गाणी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी कार्यक्रमास वंचितचे नेते हृषिकेश नांगरे पाटील, परेश शिरसंगे, शुभम चव्हाण, कौस्तुभ ओव्हाळ, ओंकार कांबळे, अभिजित बनसोडे, परमेश्वर सनाडे, सोनाली संखद तसेच सम्यकचे शहरध्यक्ष चैतन्य इंगळे, उपाध्यक्ष प्रतिक कांबळे, महासचिव जान्हवी शेलार, संघर्षा संखद, सिद्धांत धांडे, ऋषीकेश वाघमारे, विपुल सोनवणे, अक्षय कदम, संदिप बागुल, महेश पवार, योगेश इंगळे, वरद भाडाईत, पंकज गायकवाड, दिगंबर घाडगे तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती सम्यकचे रोहित भोसले यांनी दिली.






