बारामती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे मेंदू, मणका व कर्करोगासंबंधित तक्रारी असलेल्या रुग्णांकरिता व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर विनामूल्य उपचारांसाठी १७ जून रोजी सकाळी १० ते १ दरम्यान बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली आहे.
पुणे येथील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. संजय व्होरा व कर्करोग तज्ञ डॉ. चकोर व्होरा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील बाह्यरुग्ण विभागात उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार येत्या शनिवारी गरजू रुग्णांनी उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
-
नांदेड अक्षय भालेराव खून प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश -
भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रियेस सुरुवात




