जिल्हा परिषद शाळा काऱ्हाटी येथे स्नेहसंमेलन संपन्न


प्रतिनिधी गणेश थोरात

बारामती : जिल्हा परिषद शाळा काऱ्हाटी येथे स्नेहसंमेलन संपन्न झाले. मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
काऱ्हाटी व शाळा व्यवस्थापन समिती काऱ्हाटी यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन काऱ्हाटी गावच्या विद्यमान सरपंच सौ दिपालीताई लोणकर व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ रूपालीताई लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री संपतराव गावडे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी,पालकांनी मदत करावी व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपली मुले दाखल करावीत असे आवाहन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काऱ्हाटीच्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.


वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध प्रकारच्या गीतांचा समावेश यावेळी करण्यात आला.यामध्ये गणेशगीत, शेतकरीगीते, मंगळागौर,गोंधळगीत देशभक्तीपरगीत,विनोदी उखाणे,काव्यवाचन,अभंग गायन, शिवजन्मोत्सवाचा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत शिंदे सर यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीमध्ये श्री दत्तात्रय सुर्वे सर,श्री अमोल भोसले सर, सौ सुनंदा चांदगुडे मॅडम ,सौ सुरेखा भोसले मॅडम यांनी भरीव योगदान दिले.
सूत्रसंचालन श्री प्रकाश लोणकर व श्री गणेश कुंभार सर यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page