आट्यापाट्या या धाडसी आणि  रोमहर्षक खेळात जनहित प्रतिष्ठानचे घवघवीत यश


बारामती : पुणे जिल्हास्तरीय ‘आट्यापाट्या’ या खेळाच्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, (बारामती) या ठिकाणी संपन्न झाल्या.
या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालयातील 14 वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला व विभाग स्तरावर या संघाची निवड झाली आहे.
तसेच जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक विद्यालयातील 14 वर्षाखालील वयोगटात मुले व मुली या दोन्ही संघांनी जिल्हा स्तरावर आटापाट्या या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक जनहित प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.किशोर कानिटकर उपाध्यक्ष मा.श्री.सतीश गायकवाड, खजिनदार मा. श्री सतीश धोकटे व सर्व संचालक मंडळ तसेच आचार्य श्री.हनुमंत दुधाळ मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे बालभवन व्यवस्थापिका सौ.स्नेहल भिडे यांनी अभिनंदन केले.
या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री.सचिन नाळे यांनी मार्गदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page