बारामती : संपुर्ण जगाला शांततेचा व बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरामध्ये सर्व धर्म समभाव समितीच्या वतीने मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिरवणुकीमध्ये आलेल्या भाविकांना शरबत, मिठाई व लहान मुलांना खाऊ, तसेच 3000 नानकेट व फ्रुटी वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना धार्मिक व प्रेषितांच्या जिवनावरील 1200 पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
सर्व धर्म समभाव समितीच्या वतीने याही वर्षी कोणत्याही प्रकारचे डी.जे. न लावता पारंपारीक पध्दतीने कुराणचे पठन करून पैगंबर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनोख्या पध्दतीने व डि.जे. ला फाटा देऊन पैगंबर जयंती साजरी केल्यामुळे पैगंबर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजक श्री. गणेश (काका) जोजारे व प्रतिक गणेश जोजारे यांचा सत्कार करण्यात आला. सदरवेळी मोईनभाई शेख – अध्यक्ष, चैतन्य भैय्या गालिंदे – उपाध्यक्ष उपस्थित होते. व सर्व धर्म समभाव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
-
लोकाभिमुख आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था ‘ निर्मितीस प्राध्यान – आरोग्यसेवा आयुक्त -
दिवाळीपूर्वी सवलतीच्या दरातील शिधा वस्तुंचा संच घेऊन जाण्याचे आवाहन




