फलटण : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला या गावी मागासवर्गीय समाजातील होलार जातीच्या प्रकाश ताळीकुटे यांचे घरी दिनांक २४/०७/२०२२ रोजी त्यांचे मुलीचे लग्नाचे कार्यक्रमामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे का वाजविता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे अजिबात वाजवायचे नाही असे म्हणत त्या गावचे सरपंच रमेश राठोड यांनीगावगुंडांना गोळा करून टाळीकुटे कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करून लाकडाच्या दांडक्यानी बेदम मारहाण केलेली आहे. घरातील महिला व मुलींना कपडे फाडून जबर मारहाण केलेली आहे.अनेक लोक व महिला जबर जखमी झालेल्या आहेत. त्यांचेवर वरिष्ठ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
याप्रकरणी त्या गावचे सरपंच रमेश राठोड व त्यांचे गावगुंड साथीदारांवर पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी अॅक्ट सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा दाखल असतानासुद्धा अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी आरोपींना पाठीशी घालत आहेत व हे प्रकरण दादागिरीने मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत?.असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी फलटण तालुका होलार समाजाच्यावतीने उपविभागीय अधिकारी फलटण तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले. आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी अन्यथा होलार समाज महाराष्ट्रभर तीव्र व उग्र स्वरूपात आंदोलन करेल असे निवेदन दिले असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
यावेळी माजी तालुकाध्यक्ष नारायण आवटे, होलार समाजाचे नेते संदीप गोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, पत्रकार निलकुमार गोरे, युवक अध्यक्ष ओमकार अहिवळे ,लहु गोरे,देवराज गोरे इत्यादी उपस्थित होते.







